मंगळवार, ऑगस्ट ०४, २००९

टेकडी (च्या ओव्या)

माझ्या घरातून मागे
जाता टेकडी लहान
वाटेवर उंबराशी
बावी भागवी तहान

टेकडीच्या मागे रान
त्यात राघू-मैना-मोर
मुंगूस नि भारद्वाज
देती चांगला शकुन

टेकडीच्या पायथ्याशी
पेरु बागेत पिकतो
पाखरांच्या चोचीतून
माळी उरलं विकतो

टेकडीची आहे माया
जशी थोरली बहीण
ठेच लागून पडता
हळू घेते सांभाळून

जेव्हा आषाढ थांबतो
झरु लागतो श्रावण
साडी हिरवी नेसली
दिसे माहेरवाशीण

टेकडीला जरी ठाव
पायथ्याचं सारं गाव
खास ओळखते वेडी
माझ्या मनातले भाव

पाही टेकडीवरुन
मावळतं सूर्यबिंब
वाटे होऊन पाखरु
इथे घ्यावा पुन्हा जन्म

-देवेंद्र देशपांडे
२२-फेब्रुवारी-२००९

लेबल: ,

2 टिप्पण्या:

४:३७ AM, ऑक्टोबर २४, २००९ वाजता, Blogger प्रवासी म्हणातात...

कबी देवेंद्र,

टेकडी सुंदर आहे हो.

टेकडीची आहे माया
जशी थोरली बहीण
ठेच लागून पडता
हळू घेते सांभाळून

जेव्हा आषाढ थांबतो
झरु लागतो श्रावण
साडी हिरवी नेसली
दिसे माहेरवाशीण

टेकडीला जरी ठाव
पायथ्याचं सारं गाव

हे विशेष आवडले.
ओवी म्हणण्याऐवजी ह्याला अष्टाक्षरी म्हणता ये ईल असे वाटते. चू भू द्या घ्या

आपला
(रिकामटेकडा) प्रवासी

 
४:३८ AM, ऑक्टोबर २४, २००९ वाजता, Blogger प्रवासी म्हणातात...

कबी देवेंद्र,

टेकडी सुंदर आहे हो.

टेकडीची आहे माया
जशी थोरली बहीण
ठेच लागून पडता
हळू घेते सांभाळून

जेव्हा आषाढ थांबतो
झरु लागतो श्रावण
साडी हिरवी नेसली
दिसे माहेरवाशीण

टेकडीला जरी ठाव
पायथ्याचं सारं गाव

हे विशेष आवडले.

ओवी म्हणण्याऐवजी ह्याला अष्टाक्षरी म्हणता ये ईल असे वाटते. चू भू द्या घ्या

आपला
(रिकामटेकडा) प्रवासी

 

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ