मंगळवार, ऑगस्ट ०४, २००९

यमक जुळवता जुळवता

यमक जुळवता जुळवता
जी सांगायचीच राहून गेली
ती सांगण्यासाठी कविता
मी पुढची कविता लिहिली

कुणाची गाथा कुणाची कथा
वेचता-वाचता लिहिली
सामान्य जगण्यातली व्यथा
जगता-जागता लिहिली

आम्हाघरी कुठली
शब्दांची श्रीमंती
थोडे शब्द साठवून
थोडी कर्ज काढून लिहिली

-देवेंद्र देशपांडे
३-जून-२००९

लेबल: ,

1 टिप्पण्या:

७:२८ AM, सप्टेंबर ०४, २००९ वाजता, Blogger Ajit म्हणातात...

विंदांच्या "अंबारीतुनी चालले शब्द, यमक मात्र निसटले" (नक्की शब्द निसटताहेत!) च्या जवळ जाणारी ही कविता!

 

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ