मंगळवार, ऑगस्ट ०४, २००९

संस्कार

तिन्हिसांजेच्या अंधारातिल
दीपज्योतीच्या तेजामधली
आईबरोबर शुभंकरोती
आठवते आठवते

दिवाळीतल्या थंड पहाटे
फुलबाज्यांच्या रोषणाईतिल
अभ्यंगाचे स्नान ऊबीचे
आठवते आठवते

गायत्रीच्या शुभमंत्रातिल
व्रत घेण्याच्या गांभीर्याने
भिक्षांदेही मागितलेले
आठवते आठवते

शाळेमध्ये सरस्वतीची
मूर्ति गिरविली पाटीवरती
विद्येची पूजा केलेली
आठवते आठवते

आजीच्या मांडीवर बसुनी
कान्हाची गवळण शिकताना
त्याची पहिली झाली ओळख
आठवते आठवते

संस्कारांचे रेशीमधागे
अलगद विणले गेले मागे
वळुन पहाता बालपणीचे
आठवते आठवते

-देवेंद्र देशपांडे
२३-फेब्रुवारी-२००९

लेबल: ,

1 टिप्पण्या:

४:३३ AM, ऑक्टोबर २४, २००९ वाजता, Blogger प्रवासी म्हणातात...

कवी देवेंद्र,
कविता आवडली. छान आहे.

आपला
(स्मरणशील) प्रवासी

 

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ